Jaya Ekadashi 2024 Vrat Katha: जया एकादशी दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते. जया एकादशीचे स्वतःचे महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूची पूजा विधीपूर्वक केली जाते. यासोबतच उपवासही पाळला जातो. जे लोक जया एकादशीच्या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूची पूजा करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच सर्व पापांपासून मुक्ती मिळते. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
हिंदू कॅलेंडरनुसार, 2024 मध्ये, जया एकादशी 20 फेब्रुवारी मंगळवार , रोजी येत आहे. पंचांगानुसार एकादशी 19 फेब्रुवारीला सकाळी 8:49 वाजता सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 फेब्रुवारीला सकाळी 9:55 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार जया एकादशी 20 फेब्रुवारीला आहे. चला तर मग जाणून घेऊया जया एकादशीच्या व्रताची कहाणी-
जया एकादशी व्रताची कथा
पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की एके काळी स्वर्गातील नंदन वनात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला स्वर्गातील सर्व देवी-देवता, ऋषी-मुनी उपस्थित होते. कार्यक्रमात गंधर्व व गंधर्व कन्या नृत्य व गायन करत होत्या.
धार्मिक मान्यतेनुसार शतकानुशतके मल्यवान आणि पुष्यवती यांनी माघ महिन्याच्या एकादशीला काहीही खाल्ले नाही. त्यानंतर त्यांनी रात्री जागरण करून श्रीहरीचे स्मरण केले. त्या दोघांची भक्ती आणि निष्ठा पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी दोन्ही गंधर्वांना भूतरूपातून मुक्त केले. त्यानंतर सर्व संकटांपासून निवारण आणि मुक्तीसाठी जया एकादशीचे व्रत केले जाते.