संत निर्मळाबाई माहिती

रविवार, 16 फेब्रुवारी 2025 (05:45 IST)
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रात या अनेक संत होऊन गेले त्यांत महिला संत देखील होऊन गेल्या ज्यांनी आपल्या भक्तीने या भारत भूमीमध्ये एक स्थान निर्माण केले आहे. आज देखील संतांचे साहित्य आपल्याला जीवन कसे जगावे याचे उत्तम मार्गदर्शन करतात तसेच यापैकी एक संत म्हणजे संत निर्मळा होय. संत निर्मळा यांनी पंढरीच्या विठूरायाची भक्ती केली व भक्तिमार्गाचा पाय रोवला १४ व्या शतकातील संत निर्मळा ह्या महाराष्ट्रामधील एक संत व कवयित्री देखील होत्या.
ALSO READ: गजानन महाराज आवाहन
संत निर्मळा या संत चोखा मेळा यांच्या बहीण होत्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहूणाराजा या गावात त्यांचा जन्म झाला या गावात निर्मळा नावाची एक नदी व्हायची या नदीवरून त्यांचे नाव त्यांच्या कुटुंबीयांनी निर्मळा ठेवले तसेच संत बंका यांच्या संत निर्मळा या पत्नी होत्या तसेच संत सोयराबाई यांच्या नणंद होत्या संत बंका हे संत सोयराबाईंचे बंधू होते हे सर्व कुटूंब विठ्ठलाचे परम भक्त होते पंढरीचा विठुरायाचे नामस्मरण हे कुटुंबीय मनोभावे करायचे हे कुटुंब नेहमी पंढरीची वारी करायचे नंतर त्यांना मेहूणाराजा या गावावरून वारी करणे कठीण जाऊ लागले याकरिता हे कुटुंब पंढरपूरमध्ये वास्तव करू लागले
ALSO READ: Sant Narahari Sonar death anniversary 2025 संत नरहरी सोनार पुण्यतिथी
स्थानिक उच्चवर्णियांच्या वर्चस्व आणि परकीयांचे आक्रमण यामुळे तेराव्या शतकात अनके वर्गाला सोसावे लागले कर्मकांड आणि अनिष्ट प्रथांच्या आहारी मोठ्या प्रमाणात गेलेल्या समाजातील अनेक वर्गांना या प्रथांमधून बाहेर पडण्याचा मार्ग संतांनी दाखवला व नामस्मरणाचा मार्ग दाखवला  भगवंताच्या नामाचा सोपा पर्याय कर्मकांडांत अडकलेल्या समाजाला दिला. समाजाला सोप्या नामसाधनेचा पर्याय देण्याचा जो प्रयत्न वारकरी संतांनी केला तसेच या मध्ये संत निर्मळा यांचा वाटा मोठा दिसतो. नामसमरणाचे महत्व पटवून देतांना त्या सांगतात की,
संसाराचे कोण कोड । नाही मज त्याची चाड ॥
एका नामेंचि विश्वास । दृढ घालोनिया कांस ॥
जेथे न चले काळसत्ता । विठोबाचे नाम गाता ॥
शास्त्रे-पुराणे वदती । नाम तारक म्हणती ॥
देवाच्या नामसमरणावर विश्वास ठेवा. इतर कर्मकांडांत अडकू नका असे त्यांनी या अभंगातून सांगितले आहे, विठ्ठलाचे नामसमरण आपल्याला संकटातून बाहेर काढते काळाचीही सत्ता विठूमाऊलीचे नाम घेतल्यास चालत नाही  कर्मकांडामध्ये समाजाला जखडून ठेवण्यासाठी ज्या व्यवस्था पुराण आणि शास्त्राचा आधार घेत होत्या त्याच्याच आधारे संत निर्मला यांनी कर्मकांडातून समाजाला मुक्त करण्याचे प्रयत्न केले
ALSO READ: Sant Sewalal Maharaj Jayanti 2025 संत सेवालाल महाराज
तसेच संत निर्मला यांनी समाजाला नामसम्रानचे महत्व पटवून देण्याच्या कार्यात त्यांचे मोठे भाऊ संत चोखा मेळा यांनाच गुरुस्थानी मानले। संत चोखा मेळा यांच्याकडूनच नामसाधनेचा सोप्पा मार्ग आपल्याला  मिळाला असल्याचे सांगताना त्या म्हणतात की
चोखा म्हणे निर्मळेशी । नाम गाय अहर्निशी ॥
तेणे संसार सुखाचा । इह परलोकी साचा ॥
साधन हेचि थोर असे । शांती क्षमा दया वसे ॥
इतर कर्मठ आणि कठीण साधनाकडे वळण्याऐवजी लोकांनी नामसाधनेकडे वाळवावे विठ्ठल भक्ती करावी. नामस्मरण करावे यामुळे मन शांत राहते दयाळू बनते तसेच संत निर्मला या नामस्मरण महत्व काय आहे हे लोकांना सांगण्याच्या या परंपरेतील पहिला मोती होत्या संत निर्मला यांनी अनेक अभंगरचना केली आहे त्यांचे अभंग आजही समजला शिकवण देतात नामसमरणाचे महत्व पटवून देतात.

Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती