हिंदू मान्यतांनुसार प्रत्येक घराच्या बाहेर तुळस असणं आवश्यक मानले गेले आहे. एवढेच नव्हे तर जो माणूस दररोज तुळस खातो, त्याचे शरीर बऱ्याच चन्द्रायण उपवास करणाऱ्यांना मिळणाऱ्या फळासम पावित्र्य प्राप्त करतं.
पौराणिक शास्त्रानुसार, तुळशीच्या पानांच्या सेवनाने देवी देवांची विशेष कृपादृष्टी मिळते. दह्यासोबत तुळशीच्या पानांचा सेवन केल्याने अनेक प्रकाराचे आयुर्वेदिक लाभ मिळतात. जसे- दिवसभरात कामात मन लागतं, मानसिक ताण होत नाही, शरीर नेहमी ऊर्जावान राहतं.