तांदुळाला इतकं महत्त्व असतं... आपल्या माहीत आहे का यामागील कारण

तांदूळ किंवा अक्षता यांना आमच्या ग्रंथात सर्वात पवित्र धान्य मानले गेले आहे. पूजेत कुठल्याही सामुग्रीची कमी असल्यास त्या सामुग्रीचे स्मरण करत अक्षता अर्पित केल्या जातात. अशा काही वस्तू देखील असतात ज्या एखाद्या देवाला अर्पित करण्यास मनाही असते. जसे महादेवाला कुंकू, गणपतीला तुळस तर देवी दुर्गेला दूर्वा अर्पित करता येत नाही. परंतू अक्षता प्रत्येक देवाला अर्पित करता येतात.
 
जाणून घ्या याबद्दल काही विशेष माहिती:
 
* देवाला अक्षता अर्पित करताना हे त्या खंडित नसल्याचे सुनिश्चित करावे. अक्षता पूर्णतेचे प्रतीक आहे. म्हणून प्रत्येक तांदूळ अख्खा असण्याची गरज आहे. तांदळाचे केवळ 5 दाणे अर्थातच 5 अक्षता देवाला दररोज अर्पित केल्याने अपार ऐश्वर्याची प्राप्ती होते.
 
* तांदूळ स्वच्छ असावे. महादेवाला अक्षता वाहिल्यास महादेव अत्यंत प्रसन्न होतात. महादेवाला अख्ख्या अक्षता अर्पित केल्याने अखंडित धन, मान-सन्मानाची प्राप्ती होते.
 
* घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती अक्षतांच्या ढिगावर स्थापित करावी. याने जीवनात कधीच धान्याची कमी भासणार नाही.
 
* पूजेत मंत्रासह अक्षता देवाला अर्पित कराव्या.
अक्षताश्च सुरश्रेष्ठ कुंकमाक्ता: सुशोभिता:. मया निवेदिता भक्त्या: गृहाण परमेश्वर॥
 
अर्थ: हे ईश्वर, पूजेत कुंकुच्या रंगाने सुशोभित ह्या अक्षता मी आपल्याला समर्पित करत आहेत, कृपा करून स्वीकार कराव्या.
 
* अन्नात देखील अक्षता म्हणजे तांदूळ श्रेष्ठ मानले गेले आहे. याला देवान्न देखील म्हटले गेले आहे. देवतांचे प्रिय धान्य आहे तांदूळ. हे सुगंधित द्रव्य कुंकुसोबत आपल्याला अर्पित करत आहे. हे ग्रहण करून आपल्या भक्ताची भावना स्वीकार कराव्या.
 
* पूजेत अक्षता अर्पित करण्यामागे अभिप्राय हे आहे की आमचे पूजन देखील अक्षतांप्रमाणे पूर्ण असावे. धान्यात श्रेष्ठ असल्याने प्रभूला अर्पित करताना भाव असतो की आपल्या कृपेमुळेच आम्हाला धान्याची प्राप्ती होत आहे आणि घरात भरभराटी असीच राहावी. म्हणून आमच्या मनात देखील ही भावना असावी. पांढरा रंग शांतीचा प्रतीक आहे. म्हणून प्रत्येक कार्याची पूर्णता अशी असावी की त्याचे फळ आम्हाला शांती प्रदान करणारे असावे. म्हणून पूजेत अक्षता अनिवार्य सामुग्री आहे.
 
* तांदळाचे 5 दाणे देखील तेवढेच फळ प्रदान करतात जेवढे की एक मूठभर तांदूळ... श्रीमंत होण्यासाठी केले जाणारे कठिण उपायांपेक्षा योग्य आहे केवळ एक मूठभर तांदूळ. श्रद्धापूर्वक आपल्या इष्ट देवाला अर्पित करून चमत्कार अनुभव करावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती