Importance of mahamrityunjay yantra : महत्व आणि पूजा विधी जाणून घ्या

गुरूवार, 27 जुलै 2023 (22:58 IST)
भगवान शंकराचे नामस्मरण या मृत्युन्जय जपात आहे. हिंदुस्थानात आसेतुहिमाचल या मंत्राने भगवान शंकरावर अभिषेक केला जातो. श्रावण महिन्यात तर या मंत्राचे विशेष माहात्मय आहे, हा मंत्र माणसाचे मृत्युपासून रक्षण करतो. तो मंत्र असा -
 
ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः
ॐ त्र्यम्‍बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव 
बन्‍धनान्मृ त्‍योर्मुक्षीय मामृतात्
ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ !!
 
श्री महामृत्युन्जय यंत्र हे जाड तांब्याच्या पत्र्यावर उठविलेले असावे. वरील मंत्राचा जाप यंत्रपूजनाच्या वेळी करावा. या यंत्र पूजे मुळे असाध्य रोग बरे होतात. संकटे नाहीशी होऊन घरात आरोग्य नांदते. उत्तम प्रकारची मानसिक शांती मिळून आर्थिक भरभराट होते. घरात शांती नांदते. मृत्युवर विजय मिळविण्यासाठी प्राचीन काळापासुन या यंत्राचा उपयोग केला जात आहे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती