माघ महिन्याच्या पौर्णिमेला माघी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गंगा स्नान आणि दान पुण्याचे अत्यंत महत्त्व आहे. गंगा स्नान शक्य नसल्यास एखाद्या पवित्र नदीत स्नान करावे. या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. या दिवशी प्रभू विष्णूंची पूजा करावी. नंतर पितरांचे श्राद्ध करून गरिबांना भोजन, वस्त्र, तीळ, कांबळे, गूळ, तूप, जोडे, फळं आणि अन्नाचे दान करावे.
आपल्या वाणी, मन, वचन आणि कर्मामुळे कोणाचाही अपमान होऊ नये याची काळजी घ्यावी. या प्रकारे वागल्याने व्रताची पुण्य प्राप्ती होते.
प्रयागराजमध्ये एक मास कल्पवास करणार्या भक्तांचे व्रत समापन या दिवशी होतं.
सर्व कल्पवासी माघी पौर्णिमेला गंगा नदीची आरती व पूजन करून साधू संत व ब्राह्मणांना भोजन घालतात. इतर सामुग्री दान करून गंगा नदीला पुन्हा बोलवण्याचे निवेदन करत आपल्या वाटेला निघून जातात.