आईच्या उच्चारणाने मुलांना भाषेचं ज्ञान होतं. लहानपणी आईने सांगितलेल्या गोष्टी, दिलेली शिकवण, अनुभव हे मुलांच्या जीवनावर चिरस्थायी प्रभाव सोडतात. लहानपणी दिलेली शिकवण संपूर्ण जीवन त्याचे मार्गदर्शन करत असते.
मातृत्वाला पृथ्वीवर देवत्वाचे रूप प्राप्त आहे. आईचे प्रेम म्हणजे परमात्म्याचा प्रकाश आहे. जीवनाला योग्य वळण देण्यासाठी मार्गदर्शन देण्याचे कार्य आईच करते. म्हणूनच आई ही प्रथम गुरुस्थानी आहे. आई ही पहिली गुरु आणि विद्यापीठ आहे. त्यानंतर शिक्षक, आणि आध्यात्मिक गुरू. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुसह आईच्या पूजनाचे महत्त्व आहे.