Vijaya Ekadashi 2025:एकादशी तिथि शुभ असून पद्मपुराण नुसार भगवान शकरांनी नारदमुनी यांना उपदेश करतांना सांगितले होते की, जो व्यक्ती विजया एकादशीचे व्रत करतो त्याच्या पूर्वजांना स्वर्गात स्थान प्राप्त होते. तसेच या व्रताचे नियम पाळल्याने कामात यश प्राप्त होते. अशी मान्यता आहे.
7. पौराणिक मान्यतानुसार या दिवशी व्रत केल्याने पूजेचं तीनपट फल मिळतं.
8. लंकावर विजय मिळविण्यासाठी प्रभू श्रीराम यांनी याच दिवशी समुद्र काठी पूजा केली होती.
पूजाविधी- धूप, दिवा, अगरबत्ती, तूप, कुंकू, अक्षता, नैवेद्य, मिठाई, फळ, फूल, पंचामृत,
सकाळी लवकर उठून रोजचे कार्य झाल्यानंतर देवघर स्वच्छ करावे. तसेच भगवान श्रीहरि विष्णूंची आराधना करावी. यादिवशी व्रताचा संकल्प करून गंगाजल, जल, पिवळी फूले, पंचामृत, पिवळे चंदन हे भगवान श्रीहरि विष्णूंना अर्पण करावे. तसेच नैवेद्यात तुळशीचे पाने ठेवून मग नैवेद्य दाखवावा व प्रसाद सर्वांना वाटावा. यामुळे भगवान श्रीहरि विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्ती होते.