मुहूर्तवड़े कसे घालायचे पद्धत जाणून घ्या

बुधवार, 26 फेब्रुवारी 2025 (15:45 IST)
घरात लग्न असले की वेगळीच लगबग सुरु असते. या साठी पूर्व तयारी करावी लागते. लग्न म्हटले की सर्वात आधी येते ती मुला मुलीची पत्रिकाची जुळवणी. नंतर मुला मुलीची पसंतापसंती. नंतर सर्व गोष्ठी मनाप्रमाणे झाल्या की ठरतो साखरपुड़ा किंवा साक्षगंध. साखरपुड़ा करून लग्न पक्के केले जाते.
ALSO READ: साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या
नंतर लग्नाची तारीख आणि मुहूर्त काढतात.लग्नाची तारीख काढल्यावर चांगला दिवस बघून वर व वधू पक्षाकडे मुहूर्त वडे घातले जातात. घरात कोणतेही शुभ कार्य असो, मुंज, लग्न, या साठी मुहूर्त वडे घालतात. हे वड़े मुगाची पिवळी डाळ भिजवून त्याला वाटून त्यात हळद घालून बनवले जातात. त्याच बरोबर सुपारी, हळकुंड आणि गवले करण्यासाठी रवा दुधात भिजवून गोळा त्यार करायचा.  
ALSO READ: लग्नात नव्या नवरीच्या गळ्यात घातले जाणारे मंगळसूत्र उलटे का असतात जाणून घ्या
सर्वप्रथम पाटावर  लाल कापड घालून त्यावर त्यावर तांदूळ घालून सुपारीच्या रुपात गणपतीची स्थापना करून त्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून मुलीकडून किवा मुलाकडून पूजा करवून घ्यायची. गणपतीला हळदी कुंकु, अक्षता,लाल फूल वाहून मनोमने प्रार्थना करायची. 
 
नंतर पांच सवाष्णीणींना बोलावून त्यांच्याकडून पाटावर वड़े घालून घ्यायचे.हळकुंड खलबत्त्यात कुटुन घ्यायचे.सुपारी कापायचीआणि रवाचे गवले घालायचे.संपूर्ण वड़े घालून नंतर आलेल्या सवाषणींची ओटी भरून त्यांना उपहार द्यायचे.
ALSO READ: मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak
मुहूर्त वडे घातल्यावर आता दोन्ही पक्ष लग्नाची खरेदी करण्यास सुरुवात करतात. सर्वप्रथम देवासाठी हळद कुंकु अणि देवाचे वस्त्र खरेदी केले जातात. नंतर वधू पक्षांकडील वर पक्षासाठी दिले जाणारे वस्त्र आणि दागिने खरेदी करतात. तर वर पक्ष वधू पक्षासाठी दागिने आणि वस्त्राची खरेदी करतात. 
 
नंतरलग्न मुहूर्त आणि तारीख काढल्यावर  निमंत्रण पत्रिका छापण्याचे काम केले जाते. निमंत्रण पत्रिका सर्वप्रथम चांगला मुहूर्त पाहून कुलदेवताला दिली जाते. निमंत्रण पत्रिका देताना तांदूळ आणि त्यात कुंकु मिसळून अक्षता तयार करतात . या अक्षता आणि सुपारी  निमंत्रण पत्रिकेसोबत देवापुढे ठेऊन त्यांना लग्नाला येण्याचे आमंत्रण दिले जाते.  एकदा देवाला निमंत्रण पत्रिका दिल्यावर दोन्ही पक्षांकडील मंडळी इतर ठिकाणी निमंत्रण पत्रिका वाटप करण्यासाठी जातात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती