Khatu Shyam हारे का सहारा खाटू श्याम हमारा, असे का म्हणतात?

गुरूवार, 18 जानेवारी 2024 (13:36 IST)
राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात असलेले खाटू श्याम मंदिर हे लोकांच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र आहे. मान्यतेनुसार खाटू श्यामजी हे भगवान श्रीकृष्णाचे कलियुगी अवतार आहेत. खाटू श्यामजी इतर अनेक नावांनी ओळखले जातात जे त्यांच्या गुणांमुळे प्रसिद्ध झाले आहेत.
 
राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात असलेले खाटू श्याम मंदिरात देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आपल्या इच्छापूर्तीसाठी येतात. तीन बाणा धारी, शीशचे दानी आणि हारे का सहारा अशा अनेक नावांनी ओळखले जाते. खाटू श्यामजी यांना हे नाव का पडले ते जाणून घेऊया.
 
खाटू श्याम कोण आहेत?
आज खाटू श्यामजी म्हणून ओळखले जाणारे देवता खरेतर पांडवांमधील भीम यांचे नातू घटोत्कच यांचे पुत्र आहे. ज्याचे खरे नाव बर्बरीक आहे. त्यांच्यात लहानपणापासूनच शूर योद्ध्याचे गुण होते.
 
हारे का सहारा म्हणून का प्रसिद्ध
बर्बरीक यांनी महाभारत युद्धात भाग घेण्यासाठी आईकडे परवानगी मागितली. तेव्हा त्यांच्या आईला समजले की कौरवांचे सैन्य मोठ्या संख्येने असल्यामुळे पांडवांना युद्धात अडचणी येऊ शकतात. यावर बर्बरीक यांच्या आईने त्यांना परवानगी दिली आणि युद्धात हरत असलेल्या बाजूस पाठिंबा देण्याचे वचन घेतले. तेव्हापासून खाटू श्याम यांना हारे का सहारा असे म्हटले जाऊ लागले.
 
तीन बाण धारी - बर्बरिक यांच्यावर प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्यांना तीन अभेद्य बाण दिले, म्हणून त्याला तीन बाण धारी असेही म्हणतात. या तीन बाणांमध्ये इतकी ताकद होती की या तीन बाणांनीच महाभारत युद्ध संपवता आले असते.
 
शीशचा दानी - त्यांच्या आईच्या सल्ल्यानुसार, युद्धात पराभूत झालेल्या बाजूच्या समर्थनासाठी बर्बरिक आले. परंतु भगवान श्रीकृष्णांना माहित होते की कौरवांचा पराभव पाहून बर्बरिक कौरवांना साथ देतील, त्यामुळे पांडवांचा पराभव निश्चित होता. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि बर्बरिककडून दान म्हणून मस्तक मागितले. यावर बर्बरिकने तलवारीने आपले मस्तक देवाच्या चरणी अर्पण केले. म्हणूनच त्यांना शीश दानी म्हणतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती