ज्ञान
आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की कोणत्याही व्यक्तीची सर्वात मोठी पुंजी त्याचं ज्ञान हे असतं. ज्ञानाच्या साहाय्याने प्रत्येक गोष्ट मिळवता येतीत. कठिण ते कठिण परिस्थतीतून बाहेर पडता येतं. सन्मान, धन, देखील ज्ञान असलेल्या व्यक्तीकडे आपोआप येतं. अर्थात शिक्षण हे मनुष्याचा सर्वात जवळचा मित्र आहे. घर, देश, काळ यापासून लांब असलं तरी ज्ञान नेहमी मनुष्याचे रक्षण करतं असतं. ज्ञानी व्यक्तीची ओळख आणि प्रशंसा जीवनकाळापर्यंत तर असतेच आणि मृत्यूनंतर देखील लोकं त्यांनी पसरवलेल्या ज्ञानाचा लाभ घेत असतात.
गुणी साथीदार
गुणी जीवन साथीदारापेक्षा दुसरा चांगला मित्र या जगात कोणीच नाही. पत्नी गुणी असल्यास कुटुंब आणि समजात मान-सन्मानात वाढ होते. तसेच गुणी पती असल्यास कुटुंबाचे रक्षण आणि सर्व प्रकाराच्या संकटांना सामोरा जायची ताकद मिळते. गुणी साथीदारामुळे घराला घरपण येते आणि कुटुंबाला दोघांचा आधार असल्याने जीवन आनंदात घालवता येतं.