गणेश आणि बुधवार यांच्यात काय संबंध जाणून घ्या
बुधवारचा दिवस प्रथम पूजनीय प्रभू श्री गणेश यांच्याव्यतिरिक्त बुध ग्रहाला समर्पित आहे. बुधवारी गणपतीची पूजा केल्याने कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत होते. म्हणूनच या दिवशी काही उपाय केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते.
या कारणामुळे देखील गणपतीला प्रिय आहे बुधवार
बुधवारला सौम्यवार देखील म्हणतात. तर गणपती सौम्यतेसाठी प्रिय आहे. यामुळे बुधवारी गणपती पूजेचं महत्त्व आहे. बुधवार अनेक कारणांमुळे शुभ दिवस मानला गेला आहे. कोणतेही नवीन कार्य सुरु करण्यासाठी हा दिवस अनुकूल ठरेल. या दिवशी गणपतीची पूजा-अर्चना केल्याने सुख-सौभाग्य वाढतं आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते.
या उपायांनी मिळेल इच्छित फळ
गणपतीला मूगाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा. असे सात बुधवार करावं. याने मनोइच्छित फळ प्राप्ती होते. आणि बुध ग्रहाचा दोष देखील नाहीसा होतो. सोबत आपण पूजनमध्ये 11 किंवा 21 दुर्वाजोड अर्पित कराव्या अशाने गणपतीची सदैव कृपा राहते.