1 स्त्रियांचे विचार समृद्ध असावे - द्रौपदीने सांगितले आहे की कधीही बायकांचे विचार कमकुवत नसावे. नाही तर घरात समृद्धी नांदत नाही. दोन्ही परिवाराला एक सारखी वागणूक दिली जायला हवी. समोरचा व्यक्ती चुकीचे वागत असताना सुद्धा आपण आपली वागणूक चांगली ठेवावी. आपल्या स्वभावात बदल आणू नये. काहीही झाले तरी आपल्या स्वाभिमानाशी तडजोड करू नये.
3 एका स्त्रीसाठी तिचा नवरा सर्वस्व - द्रौपदीच्या म्हणण्यानुसार कुठल्याही परिस्थितीमध्ये ढासळू नका. आपल्या नवर्याला नेहमीच साथ द्यावी. कारण लग्नानंतर तोच आपले सर्व काही असतो. नवराच नसला तर सगळं काही निरुपयोगी असतं. बायकोला हवे की आपल्या पतीला साथ आणि आदर द्यावे. तसेच त्यांच्या सर्व आज्ञा पाळल्या पाहिजेत.