गणपतीच्या पूजेशी संबंधित हे सात उपाय केल्याने जीवनात शुभ घडतं

रविवार, 16 जानेवारी 2022 (14:07 IST)
सनातन परंपरेत गणपतीच्या पूजेशिवाय कोणतेही शुभ कार्य सुरू होत नाही. कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभाला श्री गणेश म्हणतात असे देखील समजू शकते. बुधवारचा दिवस तसेच चतुर्थीचा दिवस गणपतीच्या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो. चला जाणून घेऊया गणपतीच्या पूजेशी संबंधित काही सोपे उपाय. गणपती तुमच्या जीवनातील सर्व दु:ख आणि अडथळे दूर करतो आणि त्याच्या कृपेने सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते.
 
चतुर्थीला किंवा बुधवारी गणपतीच्या पूजेमध्ये गणेशाचा आवडीचा प्रसाद म्हणजेच मोदक अर्पण करावा. जर तुम्हाला मोदक मिळत नसेल तर घरामध्ये गुळाच्या 21 गोळ्या बनवून दुर्वा सोबत गणपतीला अर्पण करा. या उपायाने गणपती लवकर प्रसन्न होऊन इच्छित वरदान प्रदान करतील.
 
चतुर्थीला किंवा बुधवारी गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात. यासाठी कोणत्याही जमिनीतून दुर्वा तोडून 21 दुर्वा मोळीला बांधून गजाननाला अर्पण कराव्यात. असे मानले जाते की या उपायाने गणपती आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो.
 
जर तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक अडथळे येत असतील किंवा तुमचे विवाह निश्चित होऊनही तुटत असेल, तर चांगल्या वैवाहिक जीवनासाठी लवकरात लवकर गणपतीची साधना करा. गणपतीची पूजा केल्याने तुम्हाला तुमचा इच्छित जीवनसाथी मिळेल. यासाठी शुक्ल पक्षाच्या बुधवारपासून रोज  'ॐ ग्लौम गणपतयै नमः:' या मंत्राचा जप करावा. या उपायाने विवाहाशी संबंधित सर्व अडथळे दूर होतील किंवा विवाह लवकर ठरेल.
 
जर तुमच्या मुलीच्या लग्नात अडथळे येत असतील किंवा योग्य वर उपलब्ध नसेल तर चतुर्थीला अगर बुधवारी गणपतीच्या पूजेमध्ये प्रसाद म्हणून मालपुआ अर्पण करून व्रत ठेवावे. हा उपाय केल्याने गणपती लवकरच आपला आशीर्वाद देईल आणि इच्छित वराची प्राप्ती होईल.
 
मुलाच्या लग्नात अडथळे येत असतील तर त्यांनी चतुर्थीला किंवा बुधवारी गणपतीला पिवळ्या रंगाची मिठाई किंवा मोदक अर्पण करावेत. हा उपाय केल्याने गणपतीच्या कृपेने लवकरच विवाहाचे योग जुळुन येतात.
 
गणपतीच्या पूजेतील मंत्राप्रमाणेच यंत्र देखील चमत्कारी परिणाम देते. अशा वेळी आपल्या जीवनातील दु:ख दूर करून आनंद मिळवण्यासाठी गणेश यंत्राची विधिवत प्रतिष्ठापना करून दररोज पूर्ण भक्तिभावाने पूजा करावी. गणेश यंत्राच्या शुभ प्रभावाने घरामध्ये कोणताही अडथळा किंवा वाईट शक्ती प्रवेश करत नाही.
 
चतुर्थीला  किंवा बुधवारी कुठेतरी हत्ती दिसला तर त्याला हिरवा चारा खायला द्या किंवा पैसे दान करा. तसेच तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी गणपतीला मनापासून प्रार्थना करा.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती