चातुर्मासचे 10 नियम, 10 फायदे

बुधवार, 28 जुलै 2021 (12:50 IST)
चतुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ. याला चातुर्मास असेही म्हणतात. चतुर्मास म्हणजे चार महिने. आषाढाचे २० दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले ११ दिवस.
 
चातुर्मासाचे 10 नियम:
उपवास: चातुर्मासाच्या चार महिन्यात उपवास ठेवावे.
जमिनीवर झोपा: यादरम्यान फरशी किंवा जमिनीवर झोपाण्याचा कायदा असतो. 
सूर्योदयापूर्वी उठणे: या काळात सूर्योदयाच्या अगोदर उठणे खूप शुभ मानले जाते.
योग्य रीत्या स्नान करणे: या महिन्यात, दररोज योग्य रीत्या स्नान करावे. 
शांत रहाणे: या चार महिन्यांत कोणत्याही प्रकाराच द्वेष राग न करता शांत रहावे.
एकाशना: या चार महिन्यांत दिवसातून केवळ एकदाच सात्विक भोजन ग्रहण करावे. एकावेळी फळे खाऊ शकतात.
ब्रह्मचर्य पाळणे: या चार महिन्यांत ब्रह्मचर्य पाळले पाहिजे.
ध्यान योग किंवा संतसंग: दररोज सकाळी आणि संध्याकाळी २० मिनिटे ध्यान करावं आणि सूर्य नमस्कार करावा. आपण हे करू शकत नसल्यास सत्संगाचा लाभ घ्यावा.
भगवान विष्णू आणि शिव यांची उपासना करा: दररोज सकाळी आणि संध्याकाळी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करा किंवा ॐ नमोः नारायणाय, ॐ नमोः भगवते वासुदेवाय नम: या मंत्रांचा रोज जप करावा. त्याचप्रमाणे महादेवाची पूजा करावी. पूर्वजांना नमन करावं.
दान: या चार महिन्यांत 5 प्रकाराचे दान करा. 
अन्नदानः एखाद्या गरीब, प्राणी किंवा पक्ष्याला खायला द्या.
दीप दान: नदीच्या पाण्यात दिवा प्रवाहित करावा किंवा मंदिरात दिवा लावावा. 
वस्त्र दान: एखाद्या गरीब व्यक्तीला कपडे दान करावे. 
सावली दान: एका वाटीत मोहरीच्या तेलात आपला चेहरा पाहिल्यानंतर तेल भांड्यासह शनी मंदिरात दान करावं.
श्रमदान: कोणत्याही मंदिरात किंवा आश्रमात सेवा द्यावी.
 
चातुर्मास नियमांचे 10 फायदेः
आपले आरोग्य सुधारेल. संपत्ती मिळेल.
मानसिक पीडा नाहीशी होईल.
सर्व इच्छा पूर्ण होतील.
सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल.
सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते.
पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात.
भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होते.
आनंद आणि समृद्धीत वाढ होते. घरात भरकत येते. 
बंधु-भगिनींचे सुख प्राप्त होते.
आत्मविश्वास, त्याग, समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती