गणेशोउस्तव जवळ आला आहे. अश्यावेळेस अनेक लहान मुले आपल्या पालकांकडे हट्ट करतात की आपण घरीच गणपती बाप्पाची मूर्ती बनवून या. पण मग प्रश्न पडतो की, गणपती बाप्पाची मूर्ती कशी बनवायची. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही नक्कीच घरीच गणपती बाप्पाची मूर्ती बनवू शकतात. घरीच गणपती बाप्पाची मूर्ती कशी बनवावी तर चला जाणून घेऊ या...
पर्यायी साहित्य- पेपर मॅशे म्हणजेच कागदाचा लगदा, गव्हाचे पीठ, किंवा बेकिंग सोडा आणि कॉर्नस्टार्च मिश्रण वापरता येते.
रंग: नैसर्गिक रंग म्हणजेच हळद, कुंकू, बीट, पालकाचा रस वापरता येतो.
साधने: चाकू, स्केल, ब्रश, आणि मूर्ती घडवण्यासाठी छोटे साधने.
मूर्ती घडवण्याची प्रक्रिया
माती तयार करणे-शाडू माती पाण्यात मळून मऊ आणि लवचिक बनवा. जास्त पाणी टाळा. आता गणपतीच्या धडापासून सुरुवात करा. गोलाकार पोट आणि बसलेली मुद्रा बनवा. डोके, हात, पाय आणि सोंड वेगवेगळ्या भागांमध्ये बनवून जोडा. तसेच सोंड, कान आणि डोळ्यांना बारकाईने आकार द्या. आता दागिने, मुकुट, आणि मोदक यांसारखे छोटे तपशील मातीने किंवा इतर साहित्याने बनवा. तसेच मूर्ती 1-2 दिवस हवेशीर ठिकाणी वाळू द्या. तसेच सूर्यप्रकाश टाळा, कारण माती तडकू शकते.
रंग आणि सजावट
नैसर्गिक रंगांचा वापर करणे उत्तम असते. हळद, कुंकू किंवा बीटाचा रस वापरा. तसेच पातळ ब्रश वापरून डोळे, कपडे आणि दागिने रंगवा. आता चमकणारे दगड, छोटे कपडे, किंवा फुलांनी मूर्ती सजवा.