मंत्रात शक्ती असते का ?

शुक्रवार, 18 जून 2021 (11:10 IST)
बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो खरच मंत्रात शक्ती आहे का? 
  
याचं हे साधं उदाहरण... कुणी तरी आपल्याला आपल्या समोर बसून शिव्या घालतो, नको नको ते बोलतो. तेंव्हा आपल्यावर परिणाम होतो ?
होय, होतो. 
काय होतो ? 
 
तर, आपल्याला राग येतो. चिड येते. म्हणजेच काय तर समोरच्याने वापरलेल्या शब्दांमुळे आपल्यात निगेटीव्ह एनर्जी तयार होते. त्याचे परिणाम म्हणून राग आणि चिडचिड बाहेर पडते. म्हणजे त्या शिव्यांमध्ये ताकद आहे.
 
तसंच... आपल्यासमोर आपली खूप स्तुती केली , आपल्याला खूप चांगले बोलल्या गेले तर काय होईल?
 
आपण प्रसन्न होतो, आनंद वाटतो. एकुणच काय तर पाॕझिटीव्ह होतो. पाॕझिटीव्ह उर्जा त्या गोड शब्दांनी वाढते. म्हणजे गोड शब्दात पण ताकद आहे. 
 
तसंच अगदी तसंच या मंत्रातील शब्दात देखील एक ऊर्जा असते.
आणि हे मंत्र खूप आधी ऋषी मुनींनी संशोधनातून तयार केलेत.
आपण त्यांना जरी ऋषी म्हणत असलो तरी, ते तेंव्हाचे संशोधक होते, असे म्हणायला हरकत नाही.
 
श्रीराम जयराम जयजयराम जरी आपण शांतपणे उच्चारले तरी डोक्यात स्पंदन, लहरी निर्माण होतात किंवा विशिष्ट व्हायब्रेशन जाणवतात.
म्हणजे आपल्या शरिरातील विशिष्ट ठिकाणी व्हायब्रेशन होऊन लहरी उत्पन्न होतात. आणि निश्चितच त्यातून एक पॉझिटीव्ह एनर्जी उत्पन्न होते.
 
 ही जादू वगैरे नाही तर आपलीच एनर्जी असते. फक्त ती चार्ज करायची असते. 
 
बस एवढं साधं सरळ सोपं आहे की शब्दात , मंत्रात ताकद असतेच...
 
श्रीराम समर्थ
 
-सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती