चालू वर्षातील पहिले चंद्रग्रहण 11 फेब्रुवारीला

शनिवार, 11 फेब्रुवारी 2017 (11:58 IST)
चालू वर्षातील पहिले चंद्रग्रहण 11 फेब्रुवारी म्हणजे शनिवारपासून पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होणार आहे. वर्षाचे पहिले चंद्र ग्रहण उपछाया चंद्रग्रहण आहे. याचा विशेष काही परिणाम होणार नाही. विरळ सावलीतून जेव्हा चंद्र जात असतो तेव्हा जे ग्रहण होते त्यास छायाकल्प चंद्रग्रहण असे म्हणतात. 11 फेब्रुवारीला सुरू होणारे उपछाया चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे शक्य नाही. मात्र टेलिस्कॉप किंवा दुर्बिणीच्या माध्यमातून हे ग्रहण पाहणं शक्य आहे. 1 फेब्रुवारीला भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी ग्रहणाचा स्पर्श होईल आणि सकाळी 8 वाजून 23 मिनिटांनी ग्रहण मोक्ष होईल.
 

वेबदुनिया वर वाचा