Chanakya Niti बायकांच्या या सवयी त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व सांगतात

गुरूवार, 11 मे 2023 (22:01 IST)
नीती शास्त्रात असे म्हटले आहेत की बायकांचा स्वभाव समजणे फार कठीण आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की बायका कधी आनंदी असतात आणि कधी दुखी असतात, हे जाणून घेणं फार कठीण कार्य आहे. असे म्हणतात, की बायकांचा स्वभावाला जाणून घेण्याचे काम सर्वात अवघड आहे. चाणक्याने आपल्या नीतिशास्त्रात अश्याच काही सवयीनं बद्दल सांगितले आहे ज्यामुळे बायकांचे रूप आणि व्यक्तिमत्त्वाला समजणे सोपे जाते.
 
1 धार्मिक कार्यात रस घेणे - आचार्य चाणक्य म्हणतात की ज्या बायकांची आवड धार्मिक कार्यात असते. त्यांचे मन नेहमीच शांत असतं. अश्या बायका बढती आणि यश मिळविण्यासाठी एकाग्र असतात. नीतिशास्त्रानुसार अश्या बायकांवर दुसऱ्यांच्या यश-अपयशाचे काहीही परिणाम होत नाही. त्या फक्त आपले उद्दिष्टे मिळवण्यात गुंतलेल्या असतात.
 
2 आळशी - आचार्य चाणक्य म्हणतात की ज्या बायका आळशी असतात, त्यांना जीवनात यश मिळवणं अवघड असतं. नीतिशास्त्रानुसार, अश्या बायकांना यश मिळविण्यात अडचणी येतात. असे म्हणतात की यांना यांचे कुटुंबातील सदस्य फार प्रेम देतात पण समाजात यांना आदर मिळत नाही.
 
3 शिस्तप्रिय असणं - आचार्य चाणक्य म्हणतात की ज्या बायका शिस्तीत राहतात त्यांना लवकरच यश मिळत. असे म्हणतात की अश्या बायका दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी असतात. नीतिशास्त्रानुसार आपले स्वप्न आणि आपले कार्य पूर्ण केल्यामुळे अश्या स्वभावाच्या बायकांना कुटुंबीयांचा सदस्यांसह समाजात देखील मान मिळतो. 
 
4 द्वेष करणाऱ्या - असे म्हणतात की ज्या बायका द्वेष, मत्सर करतात, त्या कपटाने स्वतःचे यश मिळवतात. असे म्हणतात की अश्या बायका दुसऱ्यांच्या यशाच्या प्रगतीत अडथळे आणतात. अश्या बायकांवर विश्वास करू नये. कारण वेळ आल्यावर हे आपलाच विश्वासघात करू शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती