मोक्षदा एकादशी व्रत केल्याने पूर्वजांना मिळतं मोक्ष, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी, पारायण करण्याची वेळ आणि व्रत कथा

रविवार, 12 डिसेंबर 2021 (10:06 IST)
महत्व- यंदा मंगळवारी 14 डिसेंबर 2021 रोजी मोक्षदा एकादशी (Mokshada ekadashi) आहे. ही एकादशी मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला मोक्षदायिनी एकादशी रुपात साजरी केली जाते. या तिथीला पितरांना मोक्ष देणारी एकादशीच्या रूपात देखील मानलं जातं. मोक्षदा एकादशी व्रत ठेवल्याने व्रत करणार्‍यांच्या त्यांच्या पितरांसाठी मोक्षाचे द्वार उघडतात.
 
त्याचे धार्मिक महत्त्व भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णाने महाराज युधिष्ठिर यांना सांगितले होते. या व्रताचे महत्त्व ऐकूनच माणसाची कीर्ती जगात पसरू लागते. 
 
अनेक पापांचा नाश करून मोक्ष मिळवून देणारी एकादशीला मोक्षदा म्हणून ओळखले जाते. या दिवशी धूप-दीप, नैवेद्य इत्यादींनी भगवान विष्णूची पूजा करून चारही दिशांनी भगवान विष्णूंची पूजा केली जाते.
 या व्रतापेक्षा मोक्ष देणारे दुसरे उपवास नाही.
 
मोक्षदा एकादशी मुहूर्त- mokshada ekadashi muhurat
मार्गशीर्ष शुक्ल एकदशी तिथी प्रारंभ, दिवस सोमवार 13 डिसेंबर 2021 रात्री 9.32 मिनिटापासून सुरु होत आहे आणि मंगळवार 14 डिसेंबर 2021 रात्री 11.35 मिनिटावर एकदाशी तिथी संपेल.
 
व्रत पारण वेळ- बुधवार, 15 डिसेंबर रोजी सकाळी 07.5 मिनिटापासून ते सकाळी 09.09 मिनिटापर्यंत
 
mokshada ekadashi pooja vidhi मोक्षदा एकादशी व्रत-पूजा विधी-
 
- एकादशीला सकाळी स्नानादीने निवृत होऊन व्रत सुरु करण्याचा संकल्प घ्यावा.
- नंतर घराच्या मंदिराची सफाई करा.
- नंतर घरात गंगा जल शिंपडावे.
- आता देवाला गंगा जलाने स्नान करवून वस्त्र अर्पित करावे.
- मूर्ती किंवा फोटोला रोळी किंवा शेंदुर लावावं.
- तुळशीचे पानं आणि फुलं अपिर्त करावं.
- पूजनाच्या सुरुवातीला श्री गणेश आरती करावी.
- भगवान श्री विष्णुचे विधीपूवर्क पूजन करावे.
- नंतर एकादशी कथा वाचावी आणि ऐकावी.
- शुद्ध देशी तुपाचा दिवा लावावा.
- लक्ष्मी देवीसह श्रीहरि विष्णुंची आरती करावी.
* देवाला प्रसाद म्हणून फळं आणि मेवे अर्पित करावे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती