Apara Ekadashi 2024: अपरा एकादशी व्रत विधी, फायदे आणि शुभ मुहूर्त

सोमवार, 3 जून 2024 (09:58 IST)
Apara Ekadashi 2024 : यंदा अपरा एकादशी व्रत 2 आणि 3 जून रोजी पाळण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी स्मार्त व्रत आणि दुसऱ्या दिवशी वैष्णव उपवास करतील. तुम्हीही अपरा एकादशीचे व्रत करणार असाल तर जाणून घ्या पद्धत. कारण पद्धतीनुसार उपवास केल्यासच उपवासाचे फायदे मिळतील.
 
एकादशी तिथि प्रारम्भ- 02 जून 2024 रोजी सकाळी 05:04 पासून
एकादशी तिथि समाप्त- 03 जून 2024 रोजी रात्री 02:41 पर्यंत
 
व्रत ठेवण्याची विधी-
अपरा एकादशीच्या दिवशी दोन्ही वेळेस उपवास करावा. असे करणे शक्य नसेल तर एकावेळेस उपास तर दुसर्‍या वेळी शुद्ध सा‍त्विक भोजन करु शकता. नाहीतर भगर खाऊन देखील एकादशी व्रत करता येतं.
 
अपरा एकादशी व्रत विधी | How to fast on Apara Ekadashi?
एकादशी तिथी सुरू होण्यापूर्वीच दशमीपासून व्रत सुरू होते.
सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून एकादशी व्रताचा संकल्प करावा.
त्यानंतर पूजेपूर्वी घरातील मंदिरात एक वेदी बनवून त्यावर उडीद, मूग, गहू, हरभरा, जव, तांदूळ आणि बाजरी असे सात प्रकारचे धान्य ठेवावे.
त्या वेदीवर कलश स्थापित करा आणि त्यावर आंब्याची किंवा अशोकाच्या झाडाची 5 पाने ठेवा.
आता भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र ठेवा आणि भगवान विष्णूला पिवळी फुले, हंगामी फळे आणि तुळशीची पाने अर्पण करा.
नंतर अगरबत्तीने ओवाळावे. आरती करावी.
संध्याकाळी पुन्हा विष्णूची आरती करून फळे खावीत.
रात्री भजन, कीर्तन गात जागरण करावे.
दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणाला जेवू घालावे व आपल्या इच्छेनुसार दान द्यावे व नंतर उपवास सोडावा.
 
अपरा एकादशी व्रताचे फायदे :
1. अपरा एकादशी व्रत केल्याने व्यक्तीला अपार पुण्य आणि आनंद प्राप्त होतो.
2. अपरा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला ब्रह्महत्या, निंदा आणि दुष्ट आत्म्यांसारख्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
3. एकादशीचे व्रत केल्याने मानसिक शांती मिळते.
4. अपरा म्हणजे अपार, म्हणूनच या दिवशी उपवास केल्याने अपार संपत्ती मिळते.
5. या एकादशीचे व्रत केल्याने माणूस जगात प्रसिद्ध होतो.
6. धार्मिक श्रद्धेनुसार, गंगा नदीच्या तीरावर पितरांना पिंडदान अर्पण केल्याने, कुंभ किंवा बद्रीनाथमध्ये केदारनाथला जाऊन, सूर्यग्रहणाच्या वेळी सोन्याचे दान केल्याने जे फळ मिळते, तेच फळ अपरा एकादशीच्या उपवासानेही प्राप्त होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती