Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीला या 3 वस्तू नक्की खरेदी करा, आर्थिक स्थिती मजबूत होईल

शनिवार, 14 डिसेंबर 2024 (16:49 IST)
Annapurna Jayanti 2024 अन्नपूर्णा जयंतीचा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी पार्वतीचे रूप असलेल्या अन्नपूर्णा देवीची पूजा करण्याची परंपरा आहे. असे म्हणतात की जो व्यक्ती अन्नपूर्णा मातेची पूजा करतो. त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सुख-समृद्धीही कायम राहते. या दिवशी दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व आहे. पंचागानुसार अन्नपूर्णा जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी 14 डिसेंबर रोजी पहाटे 04:58 वाजता सुरू होत असून ही तिथी 15 डिसेंबर रोजी दुपारी 02:31 वाजता समाप्त होईल. त्यामुळे उदयतिथीच्या आधारे 15 डिसेंबर रोजी अन्नपूर्णा जयंती साजरी करण्यात येणार आहे. आता अशात या दिवशी काही वस्तू खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे.
ALSO READ: घरात या प्रकारे स्थापित करा देवी अन्नपूर्णा
अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तू खरेदी करा. अन्नपूर्णा देवी हे पार्वतीचे रूप आहे आणि देवीला पांढऱ्या रंगाच्या वस्तू खूप आवडतात. असे मानले जाते की जर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तू विकत घेतल्या तर तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि मानसिक शांती येईल. पांढरा रंग शुभतेचे प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी पांढऱ्या रंगाची वस्तू खरेदी करा.
ALSO READ: Annapurna Devi Aarti अन्नपूर्णा देवीची आरती
अन्नपूर्णा जयंतीला चांदीच्या वस्तू खरेदी करा. असे म्हणतात की चांदीची कोणतीही वस्तू खरेदी केल्याने कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात आणि व्यक्तीला अपेक्षित परिणामही मिळतात. याशिवाय जर तुम्हाला कोणतीही सिद्धी मिळवायची असेल तर अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी चांदीच्या वस्तू खरेदी केल्यास शुभ परिणाम मिळू शकतात.
 
अन्नपूर्णा जयंतीला धान्य खरेदी करा. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपण तांदूळ किंवा गहू खरेदी करणे आवश्यक आहे. असे म्हटले जाते की या दिवशी धान्य खरेदी केल्याने व्यक्तीला कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही आणि गरिबीपासून मुक्ती मिळते. याशिवाय तुम्हाला जीवनातील भौतिक सुख-सुविधा देखील मिळतात. त्यामुळे या दिवशी धान्याची खरेदी अवश्य करा. यामुळे माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद व्यक्तीवर कायम राहतो.
ALSO READ: श्री अन्नपूर्णा स्तोत्र
अस्वीकारण: ही माहिती धार्मिक शास्त्रावर आधारित असून केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती