सदैव देवाची सोबत

शनिवार, 17 जानेवारी 2015 (13:52 IST)
आचार्य गोविंदराव शर्मा यांनी दृष्टान्ताने या गोष्टीचे विवेचन मार्मिकतेने केले आहे.
 
एका रात्री एका व्यक्तीस स्वप्न पडले की ती समुद्र तटावर जात आहे. सोबत परमात्मा आहे. त्याच्या डोळ्यापुढे त्याच्या जीवनातील अनेक दृश्ये येत होती. प्रत्येकवेळी तिथे दोन व्यक्तींची पदचिन्हे उमटलेली दिसत. एक त्याचे व दुसरे परमात्माचे.
 
आता जीवनाच्या शेवटच्या क्षणी त्याने पाहिले की तेथे एकच पाऊल उमटलेले आहे. त्या वेळेस त्याच्या जीवनाचा कठीण काळ होता. त्याला खूप दु:ख झाले. चिंता वाटली. त्याने काकुळतेने देवाला विचारले की, देवा तुमचे सदैव तत्त्व अनुभवले तर तुम्ही सोबत असता असे आश्वासन आहे. पण मी पाहिले की आता एकच पाऊल आहे. तर संकट समयी आपण निघून जावे. ऐनवेळी तुम्ही मला सोडले. असे का घडत आहे?
 
त्यावेळी परमात्मने सहज उत्तर दिलं की, माझ मुला! मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आणि तुला कधी सोडत नाही. तुझ्या संकटसमी तुला एकच पदचिन्ह दिसले त्यावेळी मी तुला उचलून कवटाळून ठेवले होते. एक पदचिन्ह केवळ माझे होते.
 
दृष्टांत अगदी छोटाच आहे पण मार्मिक आहे. प्रेरणादायी आहे. व्यक्ती आणि परमात्मा सदैव अभेद आहेत. कारण जीव परमात्मचा अंशच आहे. देवाने जीवास विवेकसंपन्न बनवले आहे. आणि त्यांची अपेक्षा आहे की, देवाने दाखविलेल्या मार्गाने त्याने चालावे. यातच त्याचे   कल्याण आहे. नाही तर तो पतनाच्या मार्गावर जातो व जीवनाचा अनादर होऊन मोठी हानी होते. संत तुळशीदास म्हणतात- सर्व विश्व मी निर्माण केलेले आहे. सर्वावर माझी दया आहे पण जो मद व माया सोडून मन, वचन व शरीराने मला भजतो मग तो पुरुष, स्त्री, नपुंसक असा कुणीही असो. कपटभाव सोडून मला भजतो तोच मला प्रिय आहे, असे परमेश्वर सांगत असतो. तात्पर्य, देव अशा व्यक्तीस कधी विसरत नाही. सदैव त्याचे स्मरण केले की हृदयात बसून तो सर्व पाहात असतो. त्याच्या शासनाप्रमाणे वागणारा त्यास प्रिय होतो. त्याच्या सर्वतोपरी उन्नतीकरिता तो सदैव तत्पर असतो आणि विपत्तीत धावून जातो.
 
भक्तांवर व महापुरुषांवर अनेक प्रसंग आले पण सत्य पथगामीयांना ते पदरात घेऊन सांभाळीत असतात व त्यांना श्रेष्ठत्व प्रदान करतात. देव सर्वत्र, सर्वज्ञ असून श्रद्धाहीन, अज्ञानी लोकांपासून ते अवहत दूर असतात.
  

वेबदुनिया वर वाचा