रोज रामलल्लाची परिक्रमा करणारी भक्त गाय

बुधवार, 8 ऑक्टोबर 2014 (13:19 IST)
पशुपक्ष्यांमध्येही भावना असतात ही आतापर्यंत अनेक वेळा सिध्द झालेली बाब आहे. महाराणा प्रतापच्या चेतक घोड्यासारख्या अनेक प्राण्यांच्या स्वामीनिष्ठेची वर्णने तर इतिहासातही नोंदवलेली आहेत. घरातील कुत्रे असो किंवा बैल, त्यांचे धन्याविषयीचे प्रेम कुणालाही अनुभवता येऊ शकते. मात्र, अशा चतुष्पाद प्राण्यांमध्येही भक्तीची भावना असू शकते हे अयोध्येतील एक गाय दाखवून देत आहे. ही गाय लहान असल्यापासून रोज नियमाने रामजन्मभूमीवरील रामलल्लाभोवती प्रदक्षिणा घालते. 
 
या गायीचे नाव शरयू असे आहे. मोक्षपुरी असलेल्या अयोध्येतील पवित्र नदीचेच नाव या गायीला देण्यात आला आहे. रामजन्मभूमीजवळील रंगमहल मन्दिरात ती राहते. ती दोन वर्षांची होती त्यावेळेपासूनच तिने रामलल्लाच्या परिक्रमेस सुरूवात केली होती. आता ती दहा वर्षांची आहे आणि आजारी असतानाही तिची प्रदक्षिणा चुकत नाही. ती रोज सायंकाळी दीड ते दोन तास रामलल्लाची परिक्रमा करते. परिक्रमा पूर्ण झाल्यावर ती रामलल्लासमोर थांबून डोके झुकवते. मंदिराचे महंत रामशरण दास यांना हई माहिती समजल्यावर त्यांनी स्वत: अनेक दिवस या गायीच्या दिनचर्येचे निरीक्षण केले व याबाबतची माहिती खरी असल्याचे त्यांना दिसून आले. आता तिच्या या परिक्रमेत कोणती बाधा येऊ नये, अशी व्यवस्था केली आहे.

वेबदुनिया वर वाचा