पितृपंधरवडा: पूर्वजांविषयी कृतज्ञता

वेबदुनिया

सोमवार, 28 सप्टेंबर 2015 (10:50 IST)
आपल्या पूर्वजाविषयी कृतज्ञता व श्रद्घा व्यक्त करण्याच्या काळास पितृपंधरवडा किंवा श्राध्दपक्ष असे म्हटले जाते. मंगळवार दि. 28 सप्टेंबरपासून श्राध्दपक्षास प्रारंभ झाला असून तो 12 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.  

आश्विन महिन्यातील कृष्णपक्षातील पूर्ण पंधरवड्यास 'श्राद्घपक्ष' म्हटले जाते. यात भाद्रपद शुक्ल पौर्णिमेचा दिवस मिळवल्यात सोळा दिवसांचा होत असतो. या पंधरवड्यात तिथीला मरण पावलेल्या वडीलधार्‍या मंडळींना संतुष्ट करून त्यांच्याप्रती‍ कृतज्ञता व्यक्त केली जात असते. यादिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाचा पितर बसवून श्राद्घ व तर्पण केल्याने सुख, समृध्दी व संततीची प्रार्थना केली जात असते. जर तिथी लक्षात नसेल तर पितृपंधरवड्याच्या शेवटच्या दिवशी अमावास्या येते. तिला सर्वपित्री अमावास्या म्हटले जाते. या दिवशी श्राध्द केले जाते.

श्राद्घपक्षात आपले पूर्वज पृथ्वीवर येऊन आपल्या कुटूंबियांसोबत वास्तव्य करत असतात, असा उल्लेख मार्कण्डेय पुराणात आला आहे. त्यांच्या संतुष्टीसाठी श्रेष्ठ ब्राह्मणांना जेवन, दान दिले जाते. श्राध्द पक्षात तिर्थस्थानी जाऊन त्रिपींड दान केले जाते. नारायन नागबलीची पूजा केली जाते. आपल्या कुटुंबात सुख- समुध्दी नांदावी म्हणून दानधर्म केले जात असतात.

वेबदुनिया वर वाचा