कोणत्याही देवाला भक्ताकडून धन, वैभव किंवा पंचपक्वान्नाच्या नैवेद्याची गरज नसते, त्याला तर फक्त ओढ असते भक्तीची. भक्तीच्या भुकेला देवाला दोन हस्तक व तिसरं मस्तक एवढेच लागतं. म्हणून देवपूजेत अवडंबर नसावा. मग कशी करावी देवपूजा जाणून घ्या...
* देवाला स्नान घालून हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, उदबत्ती, दीप, फूल, नैवेद्य यशाशक्ती अर्पण करावे.
* दुसर्यांच्या बागेतील फुलं चोरून देवाला वाहू नये.
* देवपूजा करताना मनात चिंता, ताण, कपटी विचार नसावे.
* देवपूजेस वेळ नसल्यास वारंवार देवाचे नामस्मरण केले तरी पुण्य मिळते.
* देवपूजा अगदीच जमत नसेल त्याने आपल्या माता-पिताची सेवा करावी.