ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा वेळापत्रक

गुरूवार, 7 डिसेंबर 2023 (10:53 IST)
Sant Dnyaneshwar Sanjeevan Samadhi Sohala 2023 तीर्थक्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 727 वा संजीवन समाधी सोहळा साजरा होत आहे. 9 डिसेंबरला उत्पत्ती एकादशी आणि 12 डिसेंबरला संजीवन समाधी सोहळा संपन्न होणार आहे. 
 
माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचे हे 727 वे वर्ष असून यानिमित्ताने माऊलींच्या मंदिरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. 5 डिसेंबर पासून हैबतबाबांच्या पारीचं पूजन करून या सोहळ्याला सुरूवात झाली आहे. आता 11 डिसेंबर पर्यंत पुढील कार्यक्रम टप्प्याटप्प्याने वेळापत्रकानुसार संपन्न होणार आहे. 
 
संत ज्ञानेश्वर यांचा संजीवन समाधी सोहळ्यामध्ये पवमान अभिषेक, दुधारती, महापूजा, नैवेद्य, कीर्तन, धुपारती, जागरण होत आहे. 
 
700 वर्षांपूर्वी विठू रायाने आपल्या लाडक्या भक्त ज्ञानेश्वर माऊलींना यापुढे दरवर्षी संजीवन समाधी सोहळ्याला आळंदीला येईन असा शब्द दिला होता. अशात भाविकांची आजही येथे दर्शनासाठी गर्दी होते. यंदा देखील संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदी दुमदुमत आहे.
वेळापत्रक
6 डिसेंबर- पवमान अभिषेक, दुधारती, श्रींच्या चलपदुकांवर महापूजा, महानैवेद्य, कीर्तन
7 डिसेंबर- पवमान अभिषेक, दुधारती, श्रींच्या चलपदुकांवर महापूजा, महानैवेद्य, कीर्तन, श्रींची पालखी मंदिर प्रदक्षिणा, धुपारती, जागर
8 डिसेंबर- पवमान अभिषेक, दुधारती, श्रींच्या चलपदुकांवर महापूजा, महानैवेद्य, कीर्तन, धुपारती, जागर
9 डिसेंबर- ब्रम्हवृंदांच्या वेद घोषात पवमान, अभिषेक, दुधारती, महानैवेद्य, श्रींची नगर प्रदक्षिणा, धुपारती, जागर
10 डिसेंबर- पवमान अभिषेक, दुधारती, पंचोपचार पूजा, दिंडी, काकडा भजन सेवा, श्रींच्या चलपादुकांवर महापूजा, महानैवेद्य, रथोत्सव संपन्न, कीर्तन, प्रसाद वाटप, 
11 डिसेंबर- पवमान अभिषेक, दुधारती, श्रींच्या चलपादुकांवर महापूजा, कीर्तन, संजीवन समाधी दिनानिमित्ताने घंटा नाद, पुष्पवृष्टी, आरती, नारळ प्रसाद, महानैवेद्य, कीर्तन, धुपारती, कीर्तन, जागर
12डिसेंबर- पवमानपूजा, दुधारती, श्रींच्या चलपादुकांवर महापूजा, महानैवेद्य, कीर्तन, धुपारती, श्रींचा छबिना, शेजारती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती