एसी बंद झाल्यावर मूर्ती फुटतो घाम

मध्यप्रदेश येथील जबलपूर शहरात काली मातेचं शेकडो वर्ष जुने मंदिर आहे. मंदिर ऐतिहासिक आणि चमत्कारपूर्ण मानले आहे. येथे अनेकदा असं काही घडतं की डोळ्यावर विश्वासच बसत नाही.
 
असेच काही लोकांसोबत तेव्हा झाले जेव्हा मंदिराचे एसी बंद झाल्यावर काली मातेला घाम फुटायला लागला. ही घटना पहिल्यांदा घडली नसून असे म्हणतात की जबलपुरमध्ये सुमारे 600 वर्षांपूर्वी कालीची ही भव्य मूर्ती गोंडवाना साम्राज्य दरम्यान स्थापित करण्यात आली होती.
 
 
म्हणतात, तेव्हापासूनच मातेला जराही उष्णता सहन होत नाही आणि मूर्तीला घाम फुटायला लागतो. काळा प्रमाणे मातेच्या सुविधेसाठी मंदिरात एसी लावण्यात आले. हेच कारण आहे की मंदिरात नेहमी एसी चालू असतं. कधी-कधी काही कारणामुळे एसी बंद झाले की किंवा वीज गेली तर मूर्तीतून फुटणारा घाम सहज पाहायला मिळतो. काली मातेला फुटणार्‍या घामाचे कारण शोधण्याचा खूप प्रयत्न केला गेला, परंतू विज्ञानालाही याचे उत्तर सापडलेले नाहीत.

वेबदुनिया वर वाचा