इंद्रियेमात्र आत्म्याच्या घरात राहातात

WD
भागवतातील कथा आचरणांत आणण्यातच जीवनाची सार्थकता आहे.

खतरनाक चोर:- रस्त्यात पडलेल्या हाडाच्या तुकड्या पासून माणूस चार हात दुरून चालतो. पण तोच माणूस मास व चर्माचे वेष्ठन असलेल्या हाडाच्या स्पर्शा करता मात्र किती पागल होतो? या आपल्या शरीरात आडव्या उभ्या तिरप्या हाडांना स्नायूने बांधून वरून मासाचे वेष्ठन आहे. शरीरातून निघणारा कोणताच पदार्थ आपल्याला पाहावासा वाटत नाही. तरीही शरिरस्पर्शाकरता मन मात्र लालचावलेले असते. लक्षात ठेवा ही इंद्रिये चोरापेक्षाही जास्त धोकेबाज असतात. चोर ज्याच्या घरी राहतो, कमीत कमी त्याच्या घरी तरी चोरी करत नाही. पण इंद्रियेमात्र आत्म्याच्या घरात राहातात आणि त्याचेच विवेकरूपी धन लुटतात. आणि त्याला भ्रमरूपी खड्यात लोटून देतात. म्हणून आपल्या आत्म्याचे विवेकरूप धन लुटून नेणार्‍या इंद्रियापासून नेहमी सावध असावे.

(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)
अनुवादकः सौ. कमल जोशी

वेबदुनिया वर वाचा