Right time to read Hanuman Chalisa: चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला उत्तर भारतात हनुमान जयंती सण साजरा केला जातो ज्याला हनुमान जन्मोत्सव देखील म्हटले जाते. यंदा 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाईल. हनुमान चालीसा मंगळवार आणि शनिवारी विशेष रुपाने पठण करण्याची पद्धत आाहे तरी दररोज हनुमान चालीसा पाठ केला पाहिजे. तर चला जाणून घेऊया हनुमान चालीसा पाठ करण्याची योग्य वेळ कोणती?
ब्रह्म मुहूर्तात हनुमान चालीसा पाठ करा:-
ब्रह्म मुहूर्तात पूजा, ध्यान किंवा प्रार्थना केल्याने यश प्राप्ती होते. भारतीय वेळेनुसार प्रात: 4.24 ते 5.12 या दरम्यानचा काळ ब्रह्म मुहूर्त असतो.
दिवसाला हनुमान चालीसा पाठ कधी करावा?
दिवसाला सावित्री किंवा अभिजीत मुहूर्तात हनुमान चालीसा पाठ करु शकता. जर दिवसाला 12:30 पूर्वी राहु काल नसेल तर कधीपण हनुमान चालीसा पाठ करता येऊ शकतो.
प्रदोष काळात हनुमान चालीसा पाठ करावा:-
प्रदोष काळ ही वेळ संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारे 48 मिनिटापूर्वी सुरु होते आणि सूर्यास्तनंतर सुमारे 48 मिनिटापर्यंत असते. या काळात शिवजी आणि त्यांच्या रुद्रावतारांची पूजा केली जाते. हनुमानजी रुद्रावतार आहे. या वेळी हनुमान चालीसा पाठ करण्याची योग्य वेळ असल्याचे समजले जाते. आपल्या येथील वेळेनुसार संध्याकाळी 7:15 वाजता हनुमान चालीसा पाठ करणे शुभ आहे.
रात्री हनुमान चालीसा पाठ कधी करता येऊ शकतो?
रात्री राहु काल सोडून कधीही हनुमान चालीसा पाठ करता येऊ शकतो.