गुरु आणि संत कसे असावे? जाणून घ्या कबीर काय म्हणतात...
मंगळवार, 5 जुलै 2022 (15:07 IST)
साधू भूखा भाव का, धन का भूख नाहिं।
धन का भूखा जो फिरै, सो तो साधु नाहिं।।
साधु प्रेमचा भुकेला असतो धनाचा नाही. धनाचा भुकेला लालच करतो आणि तो कधीच खरा साधु नसू शकतो.
निरबैरी निहकांमता, साईं सेती नेह।
विषिया सूं न्यारा रहै, संतनि का अंग एह।।
वैर नसणे, निष्काम भावाने ईश्वराप्रती प्रेम आणि विषयांपासून विरक्ती- हीच खर्या संतांची लक्षणे आहेत.
तन मन ताको दीजिए, जाके विषया नाहिं।
आपा सबहीं डारिकै, राखै साहेब माहिं।।
कबीर म्हणतात की आपलं तन-मन त्या गुरुला अर्पित करावं ज्यांना विषय-वासना यांच्याप्रती आकर्षण नसेल आणि जे शिष्याचा अहंकार दूर करुन त्याला ईश्वरकडे वळवण्याचा प्रयत्न करत असेल.
जाका गुरु भी अंधला, चेरा खरा निरंध
अंधै अंधा ठेलिया, दून्यूं कूप पडंत।।
ज्यांचा गुरु आंधळा अर्थात अज्ञानी आहे आणि चेले देखील अंध भक्त आाहे. तेव्हा अंधळा अंधळ्याला धकलतो अर्थात अज्ञानी दुसर्या अज्ञानीला धकलतो, दोघे अज्ञान आणि विषय-वासनेच्या आंधळ्या विहिरीत धरपडतात आणि सपंतात.
बिन देखे वह देस की, बात कहै सो कूर।
आपै खारी खात हैं, बेचत फिरत कपूर।।
परमात्माचे विश्व न बघतात त्याबद्दल बोलणारा खोटारडा असतो. ती व्यक्ती जी कडू खाते आणि दुसर्याला कापुर विकते अर्थात स्वत: परम पद माहित नसून दुसर्यांना उपदेश देते.
साधु भया तौ का भया, बूझा नहीं विवेक।
छापा तिलक बनाइ करि, दगध्या लोक अनेक।।
हे मानव, जर विवेक जागृत नसेल तर वैष्णव किंवा शैव मत यात दीक्षित होण्याचा काय लाभ? चिह्न छापा आणि तिलक धारण करुन देखील अनेक लोकांना ठगत राहिल्याने किंवा अनेक लोकांच्या विषय ज्वालामध्ये जळत राहिले तर काय लाभ?
पंडित और मसालची, दोनों सूझे नाहिं।
औरन को कर चांदना, आप अंधेरे माहिं।।
पंडित आणि मशाल वाहणारे या दोघांनाही भगवंताचे खरे ज्ञान नसते. ते इतरांना उपदेश करत जातात आणि स्वतः अज्ञानाच्या अंधारात बुडून जातात.
फूटी आंखि विवेक की, लखै न संत असंत।
जाके संग दस बीस हैं, ताका नाम महंत।।
जेव्हा विवेकी दृष्टी नसते तेव्हा ऋषी आणि ढोंगी यांच्यात भेद करता येत नाही. जो दहा-वीस शिष्यांना बरोबर घेऊन जातो, त्याला महंत म्हटले जाऊ लागते.