कशी साजरी करावी गुरूपौर्णिमा
1. यादिवशी केवळ गुरूच (शिक्षकच) नाही, तर आई-वडिल, मोठ्या भाऊ-बहिणींची पूजा करण्याची प्रथा आहे.
2. यादिवशी वस्त्र, फळ, फुले व हार अर्पण करून गुरूंचा आशीर्वाद मिळवला पाहिजे. कारण गुरूचा आशीर्वाद कल्याणकारी आणि ज्ञानवर्धक असतो.
3. व्यासांनी रचलेल्या ग्रंथाचा अभ्यास-मनन करून त्यांच्या उपदेशांचे आचरण केले पाहिजे.
4. हा सण म्हणजे अंधश्रद्धा नसून गुरूप्रती दाखविलेला विश्वास, आदर आहे.