दाल पालक

वेबदुनिया

सोमवार, 28 मार्च 2011 (11:59 IST)
MHNEWS
साहित्य- पालक, तरडाळ, मूग डाळ (ऐच्छिक) लसूण, तिखट मीठ फोडणी साहित्य (वरून फोडणीसाठी - लाल मिरची- ऐच्छिक)
कृती- सर्वप्रथम दोन वाट्या पालक धुवून चिरून घ्यावा. तूर डाळ वा मूग डाळ पाऊण वाटी डाळ शिजवून घ्यावी. नंतर पालक उकळून घ्यावा. नंतर डाळ रवीने पालक- डाळ एकत्र करावी. पालकाचे पाणी फेकू नये ते मिश्रणात कालवावे. ताटल्यात वा वाडग्यात मिश्रण ठेवावे. कढई गॅसवर ठेवावी. फोडणीपुरते तेल टाकावे. तेल थोडेसे गरम होताच सोललेल्या लसणाच्या (८/१०) पाकळ्या टाकाव्यात. लसूण पाकळ्या लालसर होताच पालक- डाळ मिश्रण त्यात टाकावे. तत्पूर्वी चवीनुसार तिखट टाकावे. नंतर एकदा चमच्याने सारखे करत असताना चवीनुसार मीठ टाकावे. एक उकळी आल्यावर गॅस बंद करावा.

वेबदुनिया वर वाचा