घरच्या घरी अशी सजवा गुढी

गुरूवार, 24 मार्च 2022 (09:05 IST)
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढी पाडवा. गुढी पाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक यशस्कर, शुभप्रद असा मंगल मुहूर्त आहे. या दिवशी गुढी उभारण्याची परंपरा आहे. 
 
गुढीसाठी उंच बांबू किंवा काठी घ्यावी. 
काठी स्वच्छ धुऊन त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळावी.
काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा, पितळ, किंवा चांदीचे गडू, किंवा फुलपात्र बसवावे.
ज्या भागाला गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून धुऊन पुसून घ्यावी.
त्यावर रांगोळी काढून पाट ठेवून गुढीची काठी ठेवावी.
तयार केली गुढी दारात किंवा उंच गच्चीवर किंवा गॅलरीत अर्थात उंच जागेवर लावाण्याची पद्धत असते.
गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करावी.
निरांजन लावून उदबत्ती ओवाळावी.
दूध- साखर, पेढ्यांचा नैवेद्य दाखवावा.
दुपारी गुढीला गोडधोडाचे नैवेद्य दाखवावे. या दिवशी परंपरेनुसार श्रीखंड-पुरी किंवा पुरणपोळीचा बेत असतो.
संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळीस परत हळद-कुंकू, फुले, अक्षता, वाहून गुढी उतरविली जाते.
 
ह्या दिवशी आप्तेष्टांना नववर्षाचे अभीष्टचिंतन देखील केले जाते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती