गुढीचा मुहूर्त

WD
चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. गुढी उभारण्यासाठीची योग्य वेळ या वेळी सूर्योदयापासून सकाळी 9 वाजेपर्यंत आहे.

11 एप्रिल 2013 या दिवशी येणार्‍या गुढ‍ीपाढव्यास शालिवाहन शकते 1935ची सुरुवात होत आहे. हिंदू कालगणनेनुसार एकूण संवत्सरांची सख्या 60 असून, येत्या गुढीपाडव्यापासून विजय नावाच्या संवत्सराची सुरुवात होत आहे. गुढीपाडवा ज्या वारी येतो, त्या वाराच्या अधिपतीस 'संवत्सराचा' राजा म्हणण्याची पद्धत आहे. यंदाचा गुढीपाडवा गुरुवारी होत असल्याने बृहस्पती हा संवत्सराचा राजा आहे. वेदांग ज्योतिषानुसार, संवत्सराचा राजा गुरु असेल तर, ते वर्ष सर्व जनतेस समृद्धी व भरभराटीचे जाते व देशात पीकपाणी उत्तम होते.

वेबदुनिया वर वाचा