गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस वर जोरदार टीका केली. गोव्यातील म्हापसा येथील जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की गोव्यातील तरुणांची राजकीय संस्कृती, आकांक्षा काँग्रेसला कधीच समजल्या नाही. गोव्याबद्दल त्यांच्या मनात नेहमीच वैराची भावना राहिली.
पीएम मोदी म्हणाले कि गोव्यातील जनतेला गोव्यातील लोकांसाठी काम करणारे सरकार हवे असून स्वार्थ साधण्यासाठी वापर करणाऱ्या सरकारला जनता कधीही स्वीकारणार नाही. त्या पक्षांकडे अजेंडा नाही, दूरदृष्टी नाही, गोवा समजत नाही. ते येथे आले आणि गेले पण काय घोषणा करायची हे देखील समजत नाही.
ते म्हणाले की गोव्यातील जनतेलाही त्यांचे सत्य कळले असून जनतेने या पक्षांना स्पष्टपणे सांगितले आहे की, तुमची हिंसा, दंगली आणि गुंडगिरी तुमच्याकडे ठेवा. गोव्याला प्रगतीच्या मार्गावर शांततेने वाटचाल करू द्या.