गोपीनाथ मुंडे रुसले; मोठ्या पदाची अपेक्षा?

गुरूवार, 15 मे 2014 (11:15 IST)
एक्झिट पोलने दिलेल्या संकेतानुसार केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार येईल, या अपेक्षेने भाजपमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. परंतु केंद्रात मोदी देतील ती जबाबदारी घेऊ, मला पदाचा मोह नाही, असे वारंवार सांगणारे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे बुधवारी पुन्हा एकदा रुसले. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतानाच रणनीती ठरवण्यासाठी बैठक सुरू झाली तरी मुंडे हजर झाले नाही. अखेर आमदार गिरीश महाजन व पांडुरंग फुंडकर घरी जाऊन त्यांना घेऊन आले. विधानसभा निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली लढवण्याची घोषणा पक्षाने लवकर करावी, यासाठी मुंडे नाराज असल्याचे समजते.

भाजपचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजपच्या 24 जागांबाबत आढावा घेण्यात आला. राज्यात महायुतीला 35 जागा मिळतील, असा दावा नेत्यांनी केला. ‘एनडीए’ला पूर्ण बहुमत मिळणार असल्याने शरद पवारांना घेण्याचा प्रश्नच नाही, असे मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

वेबदुनिया वर वाचा