'हिंदू असो अथवा मुस्लिम; माझ्यासाठी प्रत्येकजण समान'

बुधवार, 23 एप्रिल 2014 (10:01 IST)
देशातील प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी समान आहे. मग तो हिंदू असो अथवा मुस्लिम. त्यांच्यापर्यंत पोहोचणे ही माझी जबाबदारी असल्याचे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवारी असलेले मोदी यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात सांगितले. कायद्याच्या चौकटीत राहून अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही मोदींनी यावेळी स्पष्ट केले.

मोदी म्हणाले, गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून मी राज्याच्या सहा कोटी जनतेत जातीय सलोखा निर्माण करण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहिला आहे. आता माझ्यावर राष्ट्रीय जबाबदारी राहणार आहे. त्यामुळे देशातील सव्वाशे कोटी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठीचे प्रयत्न माझ्याकडून सुरू राहतील. विशेष म्हणजे ते माझे कर्तव्यच आहे. देशाची एकता अबाधित राखणे हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. माझ्यासाठी देशातील प्रत्येक जण भारतीय आहे.

वेबदुनिया वर वाचा