शरद पवार यांनी आघाडीचे प्रचारप्रमुख करा

शुक्रवार, 23 मे 2014 (11:04 IST)
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा राज्यात धुव्वा उडाला आहे. कॉंग्रेसला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागांवर समाधान मानावे लागले. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीची नाव संकटात असल्याच्या प्रतिक्रिया आतापासून उमटू लागल्या आहेत. यामुळे विधानसभेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचाराची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोर धरत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांसारख्या अनुभवी नेत्याकडे सूत्रे दिल्यास त्यांचा आघाडी खूप मोठा फायदा होईल. पवारांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. तसेच त्यांच्या बरोबरीचा राज्यात दुसरा नेता नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही नवी मागणी समोर समोर केली आहे.

दुसरीकडे, काँग्रेसला राज्यात राष्ट्रवादीपेक्षा मोठा जनाधार आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेसकडे दुपटीने  कार्यकर्ते आहेत. 'आदर्श' घोटाळ्यामुळे अशोक चव्हाण यांना प्रचारापासून दूर ठेवले गेले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना यांच्या हाती काँग्रेसने सूत्रे दिली खरी, पण त्यांना आपला प्रभाव पाडता आलेला नाही.

वेबदुनिया वर वाचा