राहुल गांधी यांना कारणे दाखवा नोटीस

शनिवार, 10 मे 2014 (10:55 IST)
कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून अमेठीत आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे. यानंतर राहुल गांधी यांना आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

राहुल गांधी यांनी अमेठीत मतदान सुरु असताना केंद्रावर जाऊन सगळी पाहाणी केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर चौफर टीकाही झाली होती. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी आरोगावर पक्षपात करत असल्याचाही आरोप केला होता.

दुसरीकडे काही दिवसांपूर्वी राहुल यांनी भाजप सत्तेवर आल्यास 22 हजार लोक हिंसाचारात मारले जातील, असे वादग्रस्त वक्‍तव्य केले होते. राहुल यांच्या वक्‍तव्याची निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेत त्यांना नोटीस बजावली. या नोटिशीवर बारा मेपर्यंत राहुल यांना आयोगाला उत्तर द्यावे लागणार आहे.

गेल्या एक मे रोजी हिमाचल प्रदेशातील सोलानमध्ये आयोजित प्रचार सभेत बोलताना राहुल यांनी कथित वादग्रस्त विधान केले होते. . 

वेबदुनिया वर वाचा