राज ठाकरेंची कन्या उर्वशी 'मनसे' प्रचारात

मंगळवार, 15 एप्रिल 2014 (16:49 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला यांच्यासह त्यांची कन्या उर्वशी हीदेखील निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाली आहे. पुण्यात दीपक पायगुडे यांच्यासाठी बाईक रॅली काढून प्रचार केला आहे.

मनसेने लोकसभा निवडणुकीत राज्यात 10 ठिकाणीच आपले उमेदवार उभे केले आहेत. लोकसभा निवडणुकीत आपले खासदार निवडून यावेत यासाठी राज ठाकरे प्रयत्नशील आहे. मनसेकडून आपल्या परीने सर्वोत्तम प्रचार करण्याचे काम सुरु आहे. मनसेनेने नरेंद्र मोदींना पाठिंबा देऊन विकासाला साथ सांगत प्रचार सुरु केला आहे.

राज यांना आपली मदत व्हावी, शर्मिला ठाकरे यासुद्धा प्रचारात उतरल्या आहेत. त्यांनी सभा घेण्याचे टाळून रोड शो, प्रचार रॅली काढून लोकांना आकर्षित करीत आहेत. 

वेबदुनिया वर वाचा