मोदी लाट ही वार्‍यावरची वरात- रघुवंश प्रसाद सिंह

सोमवार, 5 मे 2014 (10:51 IST)
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर माजी केंद्रीय मंत्री आणि राजद नेता रघुवंश प्रसाद सिंह यांनी टीका केली आहे. रघुवंश प्रसादसिंह यांनी मोदी लाटेला 'हवा-हवाई' असे म्हटले आहे.

रघुवंश प्रसाद सिंह म्हणाले, या निवडणुकीत दोन विचारधारांची लढाई होईल. रघुवंश हे वैशालीतून राजदचे मावळते खासदार आहेत. देशात किंवा बिहारमध्ये कुठेही मोदी लाटेसारखी गोष्ट नाही. भाजप, आरएसएस आणि कॉर्पोरेट प्रचार तंत्राचा तो एक भाग आहे. माध्यमे आणि प्रचार माध्यमांनी हा विषय उचलून धरला आहे. लोक कंटाळले आहेत, प्रत्येकाला लहान लहान समस्यांचे उत्तर हवे आहे. 

वेबदुनिया वर वाचा