मोदींची कार्यपद्धती आत्मकेंद्री; शरद पवारांची टीका

गुरूवार, 24 एप्रिल 2014 (10:24 IST)
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची कार्यपद्धती आत्मकेंद्री असून अशी  पद्धत देशासाठी घातक असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी (23एप्रिल)  म्हटले. शरद पवारांन 'फेसबुक' पेजवर नवी पोस्ट अपलोड करून पुन्हा एकदा मोदींवर निशाणा  साधला आहे.

'नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धतीच आत्मकेंद्री आहे. अशा पद्धतीने देशाचा कारभार हाकता येत नाही.  देशासाठी धोरणे ठरवताना, योजना आखताना सहकार्यांना विश्वासात घ्यावे लागत असते. विविध  विषयांना मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवावी लागते. केंद्रात काम करताना देशातील प्रत्येक राज्याच्या  मुख्यमंत्र्यांसोबत काम करावे लागते', असे पवार यांनी आपल्या नव्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा