मुंबईत सेना- मनसेचा राडा; पोलिस गंभीर जखमी

शुक्रवार, 25 एप्रिल 2014 (11:33 IST)
राज्यात तिसर्‍या टप्यातील मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री पैशाची देवाण- घेवाणीवरून  शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांच्या राड्यात एक पोलिस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला आहे. कॉन्स्टेबलवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेली माहिती अशी, की शिवसेना आणि मनसेमध्ये पैसे वाटप करत असल्याच्या आरोपावरून तणाव निर्माण झाला. चेंबूरच्या महाराष्ट्र नगर भागात पैसे वाटप होत असल्याच्या संशयाने शिवसेनेने मनसेच्या गाडीची अडवणूक केली. यावेळी शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे आणि पोलिसही सोबत होते. पण त्या गाडीतून काहीच आक्षेपार्ह समोर आले नाही.

यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर काही क्षणातच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपापसात भिडले. यात एक पोलिस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या गळ्याच्या नसा कापल्या गेल्याचे समजते. 

वेबदुनिया वर वाचा