मी तर फकीर- अरविंद केजरीवाल

गुरूवार, 24 एप्रिल 2014 (10:48 IST)
'मी फकीर असून माझ्याजवळ पैसाच नाही. मात्र, भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी व कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे 'हेलिकॉप्टर पॉलिटिक्स ' आहे. मोठ्या प्रमाणात ते पैसा खर्च करत असल्याचे आम आदमी पक्षाचे नेत अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर केजरीवाल बोलत होते.

केजरीवाल म्हणाले, देशातील आम नागरिक राहुल गांधी यांना पाहूच शकत नाही. ते केवळ  अवकाशामधून उडणारे हेलिकॉप्टरच पाहतात. राहुल गांधी स्वत: आम जनतेपासून अंतर ठेवून राहतात. वाराणसीमध्येही हीच परिस्थिती आहे. वाराणसी मतदार संघामध्येही मोदींचे उडणारे हेलिकॉप्टरच दिसत आहे. तुम्हाला काय हवे आहे याचा विचार करा. आकाशात उडणारे हेलिकॉप्टर हवे की सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळणारा नेता. हवा आहे, असा सवालही केजरीवाल यांनी जनतेला विचारला.

कोणीतरी म्हटले आहे की मोदींनी जाहिरातीवर पाच हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. गांधी यांनी सुद्धा पुष्कळ पैसा खर्च केला आहे. सगळीकडे हेच नेते दिसत आहे. मी मात्र फकीर आहे. माझ्याकडे पैसाच नाही. तुम्ही दिलेल्या देणगीमधूनच मी प्रचार करत आहेत. तुम्हाला काय हवे आहे याचा आताच विचार करा. असेही केजरीवाल म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा