महिंदा राजपाक्षे दिल्लीत पोहोचले, मोदींची संभाव्य मंत्र्यांसोबत चर्चा

सोमवार, 26 मे 2014 (11:44 IST)
देशाचे 15 पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. नरेंद्र मोदी आज (सोमवार) सायंकाळी सहा वाजता राष्‍ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथ घेतील. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा राजपाक्षे सकाळी दहा वाजता दिल्लीत पोहोचले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे देखील लवकरच दिल्लीमध्ये दाखल होणार आहे.

नरेंद्र मोदींनी शपथविधी सोहळ्यासाठी सार्क देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे. आहे  शपथविधीपूर्वी मोदींनी आधी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली. नंतर मोदींनी भाजपचे ज्येष्ठ नेते  अटलबिहारी वाजपेयी यांचे आशीर्वाद घेतले. नंतर गुजरात भवनात संभाव्य मंत्र्यासोबत चर्चा केली. या नेत्यांमध्ये राजनाथ सिंह, नितिन गडकरी, सुषमा स्‍वराज, रवीशंकर प्रसाद, निर्मला सीतारमण, धर्मेंद्र प्रधान, उमा भारती, गोपीनाथ मुंडे, रामविलास पासवान, अनंत कुमार, उपेंद्र कुशवाहा, नजमा हेपतुल्‍ला यांचा समावेश आहे. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि स्मृति इराणी यांना मोदींनी चहापाण्याला आमंत्रित केले नसल्याचे समजते.

मोदींच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गुजरात भवन, राष्ट्रपती भवन, राजघाट तसेच पंतप्रधाननिवास स्थानाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

वेबदुनिया वर वाचा