मतपेट्या घेवून जाणार्‍या बसवर नक्षली हल्ला

शुक्रवार, 25 एप्रिल 2014 (11:49 IST)
झारखंडमध्ये मतदानानंतर मतपेटया घेवून जाणा-या एका बसवर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. नक्षलींनी भूसुरुंग पेरुन बस उडवून दिली. या हल्ल्यात सात जण ठार झाले. यात तीन निवडणूक अधिकारी आणि चार पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

डुमका जिल्हयातील आस्ना गावाजवळ ही घटना घडली. मतदान पार पडल्यानंतर मतपेटया  घेवून जात असताना नक्षलवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात सुरक्षासाठी तैनात असलेल्या जवानाला  आपला जीव गमवावा लागला. अनेक जण जखमी झाले आहे. स्फोट भ‍ीषण असल्याने मृत्युचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  

वेबदुनिया वर वाचा