मतदान केंद्रात महिला अधिकार्‍याचा मृत्यू

शुक्रवार, 25 एप्रिल 2014 (12:02 IST)
ठाण्यातील खोपटच्या मतदान केंद्रावर एका महिला निवडणूक अधिकारीचा मृत्यू झाला. वैशाली भावे असे या महिलेचे नाव असून त्या न्यू बॉम्बे सिटी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका होत्या.

वैशाली भावे यांच्या ड्युटी ठाणे मतदारसंघातील खोपट सिग्नलजवळच्या एस. टी. वर्कशॉप केंद्रावर लावण्यात आली होती. त्यांना अचानक भूरळ येऊन त्या जमिनीवर कोसळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरु करण्‍यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

वेबदुनिया वर वाचा