नागपुरात महिलेवर पतीसह मित्राचा बलात्कार

शुक्रवार, 25 एप्रिल 2014 (11:12 IST)
नागपुरात पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आली. एका नराधमाने  पत्नीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्तापित केले. एवढेच नव्हे तर मित्राला तिच्यावर बलात्कार  करण्यास प्रवृत्त केले. ही घटना गुरुवारी (24 एप्रिल) उघडकीस आली आहे. या घटनेनंतर दोन्ही  नराधम फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय पीडिता घरी असताना पती बिलाल खान उर्फ सलमान  खान (20) हा आणि त्याचा मित्र इकबाल (40) आला. इकबालसमोरच बिलालने पत्नीशी बळजबरीने   शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर त्याने इकबालला तिच्यावर बलात्कार करण्यास प्रवृत्तही केले. 

वेबदुनिया वर वाचा