नरेंद्र मोदी हे भारताचे निक्सन : चीनची स्तुतिसुमने

गुरूवार, 22 मे 2014 (11:55 IST)
भारतामधील लोकसभा निवडणुकीमध्ये नेत्रदीपक विजय मिळविलेल्या नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत चीनने त्यांना ‘भारतीय निक्सन’ची उपमा दिली आहे. मोदी यांचे अभिनंदन करत चीनमधील सरकारी थिंक टँकने मोदी यांची कार्यशैली चिनी कार्यशैलीच्या बरीच जवळची असल्याचे मत व्यक्त केले आहे. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी 1972 मध्ये चीनला भेट दिली होती.

या भेटीमुळे तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचा चेहरामोहरा पालटल्याचे मानले जाते. शीतयुद्धाच्या राजकारणामध्ये या भेटीमुळे अचानक नवी दिशा मिळून चीन व अमेरिका जवळ येण्यास मदत झाली होती होती. निक्सन यांना आजही चीनच्या राजकारणामध्ये व जनमानसामध्ये मानाचे स्थान आहे.

वेबदुनिया वर वाचा